Special Report | उदयनराजेंचा रोख नेमका आहे तरी कोणाकडे?

भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील मैदानावरुन तत्कालीन पालकमंत्र्यांवर जहरी टीका केलीय. उदयनराजेंनी टीकेवेळी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. पण ज्यावेळी सातारा स्टेडीअमचं काम सुरु झालं त्यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री अजित पवार होते.

भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील मैदानावरुन तत्कालीन पालकमंत्र्यांवर जहरी टीका केलीय. उदयनराजेंनी टीकेवेळी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. पण ज्यावेळी सातारा स्टेडीअमचं काम सुरु झालं त्यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री अजित पवार होते. म्हणून उदयनराजे यांचा टीकेचा रोख अजित पवारांवर असल्याचं बोललं जातंय. “त्यावेळी पालकमंत्री होते इकडचे. त्यांनी या सर्वांवर उत्तर द्यावं. प्रत्येकवेळी मी नाही… मी नाही… मी काय केलं मी काय केलं… मुस्काडलं पाहिजे यांना…ऐन मोक्यावरची जागा कशी मिळणार? ज्यांनी बांधकाम केलं… आपण टेंडर काढलं होतं स्टेडियमचं. आपण काही व्यापारी संकुलाचं टेंडर काढलं नव्हतं”, असंही ते म्हणाले. स्टेडियमचे टेंडर काढलेले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI