Mumbai BJP President : अमित साटम नवे भाजप मुंबईचे अध्यक्ष, फडणवीस म्हणाले, येत्या काळात घोडदौड अन् पुन्हा…
“आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळले. 2017 मध्ये झालेल्या निवडणुका असतील, आत्ताच्या निवडणुका त्यांनी उत्तम काम केलं. विधानसभेत चांगलं यश मिळालं. मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून आपलं वर्चस्व सिद्ध केलं” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेलारांचं कौतुक केलं.
येत्या काही महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपकडून एक मोठी घोषणा करण्यात आली. भाजपकडून आज नव्या मुंबई भाजप अध्यक्षाची निवड जाहीर करण्यात आली. प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा असताना भाजपकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून करण्यात आली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. अमित साटम यांचं नाव जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले, अमित साटम यांची अभ्यासू आणि आक्रमक अशी प्रतिमा आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल. पुन्हा महायुतीची मुंबईत सत्ता येईल हा विश्वास आहे. सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या साटम चांगल्या पद्धतीनं पार पडतील. राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीमागं आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

