AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Election : कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यांनाच राणांवर डाऊट? राणा अन् बोंडेंमध्ये जाहीर शाब्दिक चकमक

Amravati Election : कमळ की पाना? कुणीकडे राणा? भाजप नेत्यांनाच राणांवर डाऊट? राणा अन् बोंडेंमध्ये जाहीर शाब्दिक चकमक

| Updated on: Jan 09, 2026 | 12:04 PM
Share

अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा आणि भाजप नेते अनिल बोंडे यांच्यात जाहीर सभेत शाब्दिक चकमक झाली आहे. राणा भाजप उमेदवारांसह पतीच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचाही प्रचार करत असल्याने हा वाद निर्माण झाला. बोंडेंनी निष्ठेचा मुद्दा उपस्थित केला, तर राणांनी भाजपसोबतच्या प्रामाणिकतेचा पुनरुच्चार केला.

अमरावतीमध्ये भाजपच्या नवनीत राणा आणि पक्षाचे नेते अनिल बोंडे यांच्यात जाहीर सभेतच शाब्दिक चकमक झाली. अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हा प्रकार घडला. नवनीत राणा भाजप उमेदवारांबरोबरच त्यांचे पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या (वायएसपी) उमेदवारांचाही प्रचार करत आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. यावरून अनिल बोंडे यांनी राणा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एकदा भगवा घातल्यावर जुने विसरून जावे लागते. माझा सख्खा भाऊ जरी दुसऱ्या पक्षातून उभा असता, तरी मी भगव्याला प्रामाणिक राहिलो असतो,” असे बोंडे म्हणाले. यावर प्रत्युत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या की, त्यांनी कमळ गळ्यात घातले आहे आणि भगवा त्यांच्या रक्तात आहे. महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घडामोडीमुळे अमरावतीतील स्थानिक राजकारण तापले आहे.

Published on: Jan 09, 2026 12:04 PM