नारायण राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं सूचक वक्तव्य; ‘एक दिवस थांबा, जल्लोष…’
अद्याप नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं नाही, त्यामुळे नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. तर नारायण राणेंची उमेदवारी कधी जाहीर होणार असा प्रश्न देखील विचारला जातोय. अशातच रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली मात्र अद्याप नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं नाही, त्यामुळे नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. तर नारायण राणेंची उमेदवारी कधी जाहीर होणार असा प्रश्न देखील विचारला जातोय. अशातच रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा कायम असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ‘आमची भूमिका वारंवार मांडली आहे की शिवसेनेने दावा केलेला आहे, गेल्यावेळी एक लाख 75 हजार मतांनी आम्ही जिंकलो होतो, त्यावेळी निवडून आलेले खासदार हे शिंदे सोबत आलेले नाही. तळकोकण आणि धनुष्यबाण याचा एक वेगळं असं अलौकिक नातं आहे म्हणून ही जागा शिवसेनेला मिळावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे, आणि ही जर जागा शिवसेनेला मिळाले तर आमचा उमेदवार एकमताने ठरलेला आहे, असे उदय सामंत म्हणाले तर दूसरीकडे नितेश राणेंनी सूचक वक्तव्य करत असे म्हटले की, एक दिवस थांबा रामनवमीला तुम्ही जल्लोष करणार आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या किंवा परवा मिळतील, असेही त्यांनी म्हटले.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

