Special Report | जिथं Election..तिथं नव-नव्या वादांचं Connection- Tv9

फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. सत्तेसाठी हे लाचार झालेत अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय. तर काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 26, 2022 | 9:02 PM

मुंबई : मलाडमधील क्रिडा संकुलाच्या नावावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. भाजपने (Bjp) टिपू सुलतान (Tipu Sultan) नावाला जोरदार विरोध दर्शवत आक्रमक आंदोलन केलंय. यात अनेक भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाजपबरोबर या आंदोलनात बजरंग दलही सामील असल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. सकाळी फडणवीसांनी या नावाला विरोध केला आणि आता पोलिसांच्या या कारवाईवरून फडणवीसांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. तर काँग्रेसकडूनही (Congress) फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. सत्तेसाठी हे लाचार झालेत अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय. तर काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक तासांपासून मालाडमध्ये या आंदोलनामुळे हायव्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला. क्रिडा संकुलाच्या उद्घटनानंतर अस्लम शेख यांनीही भाजपवर जोरदार पलटवार केलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें