भाजप नेत्यांनी रस्त्याला टिपू सुलतान नाव दिलं, फडणवीस राजीनामा घेणार? अस्लम शेख यांचा सवाल

ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी फडणवीसांना विचारला आहे.

भाजप नेत्यांनी रस्त्याला टिपू सुलतान नाव दिलं, फडणवीस राजीनामा घेणार? अस्लम शेख यांचा सवाल
अस्लम शेख
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 6:08 PM

मुंबई : मुंबईच्या राजकारणात सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे टिपू सुलतान. (Tipu Sultan) मालडमधील एका क्रिडा संकुलाच्या नावावरून हा सारा वाद पेटलाय. या नावाला भाजपसह (Bjp) बजरंग दलाने जोरदार विरोध केला. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. याच्या उद्घाटनानंतर अस्लम शेख यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार पलटवार केलाय. भाजपने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे. ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी फडणवीसांना विचारला आहे. आता भाजपच्या पोटात अचानक का दुखू लागले? असाही सवाल त्यांनी विचारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या नावावरून जोरदार पॉलिटिकल राडा सुरू आहे.

भाजप लोकांना मुर्ख बनवत आहे-अस्लम शेख

जर फडणवीसांनी प्रस्ताव ठेवणाऱ्या नगरसेवकाचा आणि मंजुरी देणाऱ्या आमदाराचा राजीनामा घेतला तरच त्यांची नियत साफ असेल, अन्यथा त्यांची नियत साफ नाही असेही अस्लम शेख म्हणाले आहेत. येत्या महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थरला जात आहे, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या नियमानुसान एकदा कुठेही कुणाचेही नाव दिले ते हटवता येत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच इथे झालेल्या विकासाकडे बघा, नावाच्या वादाकडे जास्त लक्ष देऊ नका, भारतीय जनता पक्ष लोकांना नावाच्या नादात मुर्ख बनवत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. सत्तेसाठी शिवसेनेची लाचारसेना झाल्याची टीकाही भाजपकडून सतत करण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीसांची भूमिक काय?

हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही. त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे. हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विरोध केला. ज्या टिपू सुलतानानेने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही. त्यांचं नाव मैदानाला देणं अयोग्य आहे. अत्याचार करणाऱ्याचं महिमामंडन करण्याचं काम होत आहे. हा निर्णय रद्द केला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

टिपू सुलतान नावाला विरोध बजरंग दल रस्त्यावर, अनेकांची धरपकड; भाजपचे खासदार, आमदारही आंदोलनात

शिवसेना की ‘लाचारसेना’? उद्यानाला हिंदुद्वेष्ट्या टिपू सुलतानचे नाव खपवून घेणार नाही-भाजप

VIDEO: टिपू सुलतान देश गौरव होऊच शकत नाही, मुंबई महापालिकेच्या वादात फडणवीसांची उडी

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.