Election Postponement : भाजपकडून निवडणूक आयोगाला थेट पत्र; रवींद्र चव्हाण आक्षेप घेत म्हणाले, मतदानाला एक दिवस अन्….
निवडणूक आयोगाने काही नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांना दिलेल्या स्थगितीवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संबंधित मुद्द्यांवरून सध्या राज्याच्या राजकारणात अनेक वाद सुरू आहेत. निवडणूक आयोगाने काही नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांना स्थगिती दिल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निर्णयावर आक्षेप नोंदवत राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवले आहे. मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणे हे अयोग्य असल्याचे चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या निवडणुका पार पडायला हव्या होत्या, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्थगित केली आहे, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती येईपर्यंत निवडणूक स्थगिती कायम ठेवावी, अशी मागणी उज्वला थिटे यांनी न्यायालयाकडे करणार असल्याचे म्हटले आहे.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

