‘मविआ’ म्हणजे ‘एक दिल के टुकडे हुए हजार’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल

हर्षदा शिनकर

Updated on: Jan 23, 2023 | 8:27 AM

'विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात विदर्भाला न्याय मिळवून देण्याचे काम करण्यात आले. पण महाविकास आघाडी सरकारने या मंडळकाडे दुर्लक्ष केले'

विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ अमरावतीमध्ये अयोजित पदवीधर मतदार मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.

जेव्हा जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा विदर्भाशी बेईमानी करण्यात आली. तर विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात विदर्भाला न्याय मिळवून देण्याचे काम करण्यात आले. पण महाविकास आघाडी सरकारने या मंडळकाडे दुर्लक्ष केले आणि विदर्भावर अन्याय केला, असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महाविकास आघाडीची सध्याची अवस्था ‘एक दिल के टुकडे हुए हजार’, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून महाविकास आघाडी तयार झाली. जे आपल्या सोबत निवडून आले त्यांनी बेईमानी केली. पण आज मला अभिमान आहे, मर्द मराठा एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. हुकूमशाही विरोधात आवाज उठवणारे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे सरकार बनलं, याचा मला अभिमान आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI