Yashomati Thakur | अमरावतीत भाजप कुबड्या… काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल

अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीत भाजपचं संख्याबळ मोठ्या प्रमाणावर घसरलं आहे. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे फक्त 25 जागांवर उमेदवार निवडून आले आहेत, मात्र काँग्रेसने आपलं संख्याबळ कायम ठेवलं आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने जोरदार मुसंडी मारत 15 जागांवर विजय मिळवला आहे.

अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीत भाजपचं संख्याबळ मोठ्या प्रमाणावर घसरलं आहे. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे फक्त 25 जागांवर उमेदवार निवडून आले आहेत, मात्र काँग्रेसने आपलं संख्याबळ कायम ठेवलं आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने जोरदार मुसंडी मारत 15 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष एकत्र आघाडी करणार अशा चर्चा सुरु आहेत. यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ‘काँग्रेसने प्रचार केला परंतु तेवढा आकडा आम्ही गाठू शकलो नाही’ परंतु कुबड्या घेऊन मोडकळीस आलेलं सरकार स्थापन होताना दिसतंय, असा टोला विरोधकांना लावला आहे. ‘अमरावतीचं भलं व्हावं असं वाटतंय. पण वास्तविकरीत्या ते दिसत नाही’ असंही ठाकूर म्हणल्या. युवा स्वाभिमानला घेतल्यशिवाय भाजप सत्ता स्थापन करणार नाही, भाजप लाचार झाली आहे. युवा स्वाभिमानने भाजपला व्यवस्थित नाचवलं आहे, असं म्हणत ठाकूर यांनी रवी राणांवर निशाणा साधला आहे.