संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार? भाजपच्या सर्व खासदारांना व्हीप जारी

संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter session) आजपासून सुरु होत असून पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे.

संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter session) आजपासून सुरु होत असून पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपुर्वीच तीनही वादग्रस्त कायदे (Three Farm Laws) मागे घेण्याची घोषणा केलीय. त्यानंतर कॅबिनेटनेही त्याला मंजुरी दिलीय. पण प्रत्यक्षात तीनही कायदे रद्द करणारं विधेयक आजच अधिवेशनात मांडलं जाईल आणि त्यानंतर इतर प्रक्रिया पार पडेल. विरोधी पक्षही फक्त तीन वादग्रस्त कृषी कायदेच नाही तर एमएसपीचा मुद्दा, महागाई अशा मुद्यावरही सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI