Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Election Video : 27 वर्षांनंतर भाजपचं कमळ, दिल्ली काबीज होताच मोदी ॲक्शन मोडमध्ये, अरविंद केजरीवालांना थेट इशारा

Delhi Election Video : 27 वर्षांनंतर भाजपचं कमळ, दिल्ली काबीज होताच मोदी ॲक्शन मोडमध्ये, अरविंद केजरीवालांना थेट इशारा

| Updated on: Feb 09, 2025 | 10:36 AM

दिल्लीत भाजपची 27 वर्षांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत 27 वर्षानंतर भाजपला विजय मिळवला आणि केजरीवाल यांची आम आदमी पार्टी अवघ्या 22 जागांवर आली. काँग्रेसचा खाताही उघडला नाही तर विजय मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजरीवालांना इशारा दिला जेवढं लुटलं ते परत करावं लागेल असा सूचक इशारा मोदींनी दिला आहे.

दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षानंतर भाजपचं कमळ पुन्हा आणि त्याचा मोठा जल्लोष झाला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा पराभव करत भाजपने मोठा विजय मिळवला. दिल्लीपासून ते महाराष्ट्रातही भाजपचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. भाजपला 48 जागा तर आम आदमी पार्टीला 22 जागा मिळाल्या. काँग्रेसचा खातंही उघडला नाही. दिल्लीमध्ये काँग्रेस शून्यावर राहिली. 2020 मध्ये आम आदमी पार्टीला 62 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे 40 जागा आपने गमावल्या तर भाजपला अवघ्या आठ जागा होत्या. तब्बल 40 जागांची मुसंडी भाजपने मारली. आपच्या कमी झालेल्या सर्व जागा भाजपन घेतल्याचे यंदा पाहायला मिळाले.

अरविंद केजरीवाल यांनी गेल्या तीन टर्ममध्ये फ्रीच्या घोषणा देत मतदारांना आकर्षित केलं होतं. त्याचप्रमाणे यावेळी भाजपचाही फ्रीचा फॉर्म्युला हिट ठरला आहे. महिलांना 2500 रुपये, गर्भवती महिलांना 21 हजार रुपये, महिलांना बस मध्ये मोफत प्रवास, वृद्धांना 2500 रुपये दरमहा पेन्शन, गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी, होळी आणि दिवाळीला एक एक सिलेंडर मोफत, 200 युनिट पर्यंत वीज मोफत, महिन्याला 20 हजार लिटर पाणी मोफत, वृद्धांचा 10 लाखापर्यंत मोफत इलाज, आयुष्मान योजनेसह दिल्ली सरकारकडून पाच लाख असे दहा लाखांचं हेल्थ कव्हर देण्यात येण्याच्या घोषणा केली. भाजपच्या विजयानंतर आता केजरीवालांची मोदींना आव्हान देणारी वक्तव्य व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये या जन्मी मोदी दिल्ली जिंकू शकत नाहीत असं केजरीवाल म्हणाले होते. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 09, 2025 10:29 AM