Tv9 Marathi Special Report । अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगचा मोठा प्रभाव
श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत राज्यात पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. भाजपने केवळ स्पष्ट बहुमतच मिळवले नाही, तर 200 चा टप्पाही पार करत दमदार कामगिरी केली आहे. यामुळे मागील 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे.
या निकालानंतर पश्चिम बंगालपासून ते दिल्लीपर्यंत भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या पराभवामागे अनेक कारणे समोर येत आहेत. सर्वप्रथम अँटी-इन्कम्बन्सीचा फटका बसल्याचे मानले जात आहे. 2011 पासून सत्तेत असलेल्या सरकारविरोधात निर्माण झालेल्या नाराजीचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला.
याशिवाय कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून आणि हिंसेच्या आरोपांमुळेही मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. दुसरीकडे, भाजपने अत्यंत बारकाईने मायक्रो प्लॅनिंग करत प्रत्येक मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. उमेदवार निवड, प्रचार रणनीती आणि घराघरात पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ, लाखो कार्यकर्त्यांचा सहभाग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बंगालमधील सक्रिय उपस्थिती यामुळे भाजपला मोठा फायदा झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यात अनेक सभा घेत जोरदार प्रचार केला. स्वबळावर आणि मित्र पक्षांच्या मदतीने देशात एकूण 22 राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यात आता पश्चिम बंगालसारखं मोठं राज्य भाजपच्या खात्यात जुळलं आहे.
या सर्व घटकांच्या जोरावर भाजपने पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे.
अब की बार पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार; कायदा-सुव्यवस्था आणि भाजप.....
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून....
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....

