BMC Eelection 2025 : मुंबई महापालिकेच्या आरक्षणात कुणाचा पत्ता कट? वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली असून, 61 जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओपन वॉर्ड ओबीसीत गेल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे. यामध्ये तेजस्वी घोसाळकर, मकरंद नार्वेकर, नील सोमय्या यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. या आरक्षणामुळे काही प्रमुख उमेदवारांच्या निवडणूक लढवण्याच्या शक्यतांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, मुंबई पालिकेतील एकूण 61 जागा आता इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) राखीव असणार आहेत. या आरक्षण सोडतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांचे वॉर्ड आता ओबीसी आरक्षित झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे.
या आरक्षणामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर (प्रभाग क्रमांक एक), मकरंद नार्वेकर (प्रभाग क्रमांक 227), नील सोमय्या (प्रभाग क्रमांक 108), रवी राजा (प्रभाग क्रमांक 176), अतुल शहा (प्रभाग क्रमांक 220), कप्तान मलिक (प्रभाग क्रमांक 170), आशिष चेंबूरकर (प्रभाग क्रमांक 196), यशवंत जाधव (प्रभाग क्रमांक 209), स्नेहल आंबेकर (प्रभाग क्रमांक 198) आणि संगीता हंडोरे (प्रभाग क्रमांक 150) यांसारख्या प्रमुख नावांना फटका बसला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लढवता येणार नसल्याने भावनिक पोस्ट केली असून, जनसेवेचा मार्ग थांबणार नसल्याचे म्हटले आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

