Saif Meet AutoDriver Video : अखेर सैफनं ‘त्या’ रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
मुंबईकर नागरिकांकडून रिक्षाचालक भजन सिंह राणा यांचा सन्मान करण्यात आलाय. यानंतर आज सैफ अली खान याने स्वतः वेळेवर देवासारखं धावून आलेल्या रिक्षा चालकाची भेट घेतली.
अंगावर वार आणि रंक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सैफला तत्काळ लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र ज्या रिक्षातून सैफला रूग्णालयातून नेण्यात आलं त्या रिक्षाचालकाला मुंबईकरांकडून सॅल्यूट करण्यात आलंय. मुंबईकर नागरिकांकडून रिक्षाचालक भजन सिंह राणा यांचा सन्मान करण्यात आलाय. यानंतर आज सैफ अली खान याने स्वतः वेळेवर देवासारखं धावून आलेल्या रिक्षा चालकाची भेट घेतली. नुकताच रिक्षाचालक भजन सिंह राणा आणि सैफ अली खान यांचा एक फोटो समोर आला आहे. सैफ अली खान याने रिक्षाचालक भजन सिंह राणा यांची भेट घेतली. त्यावेळचा हा फोटो असल्याचे सांगितलं जातंय. रिक्षाचालक भजन सिंह राणा आणि सैफ अली खान याच्या या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेता सैफ अली खानवर आरोपीने चाकूने हल्ला केल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. यावेळी सैफला आपली कार काढणं शक्य झालं नव्हतं त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाला हात दाखवत सैफ तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल झाला होता. मध्यरात्री घडलेल्या या हल्ल्यानंतर रिक्षाचालकाने सैफकडून कोणतेही पैसे न घेता त्याला वेळेत रुग्णालयात दाखल केलं होतं. यानंतर टीव्ही ९ मराठीशी त्याने संवाद साधला. यावेळी सगळा प्रसंग सांगितला होता.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
