Mumbai | बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश, सलमानवरील संकट टळलं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 26, 2021 | 8:29 PM

लगेचच सलमानला जवळच असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलं. नंतर अशीही माहिती समोर आली की, जो साप सलमानला चावला होता, तो विषारी नव्हता.

मुंबई : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सलमान खानचा पनवेलमध्ये आज सकाळी सापानं कहर केला. सापानं सलमानला दंश केला. लगेचच सलमानला जवळच असलेल्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांच्या उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरीही पाठवण्यात आलं. नंतर अशीही माहिती समोर आली की, जो साप सलमानला चावला होता, तो विषारी नव्हता. सलमानचं फार्म हाऊस पनवेलमध्ये ज्या ठिकाणी आहे, तिथं सर्रास सरपटणारे प्राणी आढळून येतात. तिथं साप दिसणं, यात नवीन काहीतरी दिसण्यासारखं नसून, ती एक सर्वसाधारण गोष्ट आहे. पण त्याच सापाला काय माहिती की भाईजान सलमान खान सेलिब्रिटी आहेत ते? भाईजान सलमान खानला (Salman Khan) रविवारी सकाळी साप चावला. बातमी वायूवेगानं चाहत्यांपर्यंत पोहोचली. सलमानच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी चाहत्यांनी देव पाण्यात ठेवले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI