Breaking | अहमदनगर पालिकेत राष्ट्रवादी-शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत

अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा महापौर आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jun 22, 2021 | 10:38 PM

सांगली आणि जळगाव महापालिकेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर आता अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं स्पष्ट झालंय. कारण, अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा महापौर आहे. मात्र, आता शिवसेनेचा उमेदवार देण्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें