David Vance : मला वाटतं ट्रम्प भरकटलेत… ब्रिटीश लेखकाची चीन, तुर्की अन् पाकवर टीका, अमेरिकेला काय सल्ला?
डेव्हिड व्हान्स यांनी एका मुलाखतीत ते म्हणाले, 'चीन पाकिस्तानचा वापर प्रॉक्सी म्हणून करतो, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येत नाही. मला वाटतं डोनाल्ड ट्रम्प यांनी हे समजून घेतलं पाहिजे.
ब्रिटिश लेखक डेव्हिड व्हान्स यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर एक मोठे वक्तव्य केले आहे. चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने डेव्हिड व्हान्स यांनी या दोन्ही देशांवर टीका केली आहे. चीनकडून पाकिस्तानचा प्रॉक्सी म्हणून वापर केला जातो, असं ब्रिटीश लेखक डेव्हिड व्हान्स यांनी म्हटलं आहे. तर चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, असेही म्हणत त्यांनी चीनवर टीकास्त्र डागलं आहे. यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानविरोधात भारताला शक्य तेवढी मदत करावी, असं डेव्हिड व्हान्स यांनी सांगितलं असून पाकिस्तान अपयशी आणि दहशतवादी देश असल्याचे स्पष्टपणे म्हटलं आहे. डेव्हिड व्हान्स यांनी चीनसह तुर्कीवर टीका करत तुर्की देश समस्याप्रधान असल्याचे म्हटलं आहे. जर भारताला योग्य पाठिंबा मिळाला तर ते आशिया प्रदेशात चीनविरुद्ध पश्चिमेसाठी एक मजबूत भिंत म्हणून काम करू शकते, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग

