Boycott Turkey : पाकिस्तानला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून आणखी एक मोठा निर्णय
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. या दरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. हे लक्षात घेता, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) आणि ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघटनांनी सर्व भारतीय चित्रपट निर्मात्यांना तुर्कीमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण करू नये, असे आवाहन केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू असताना आणि तणावादरम्यान, पाकिस्तानला दिलेली साथ तुर्कीला चांगलीच भोवणार आहे. कारण भारतातील चित्रपट निर्मात्यांनी तुर्कीमध्ये कोणताही चित्रपट चित्रित करू नयेत, असं आवाहन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचं चित्रपट निर्मात्यांना केलं आहे. यासह ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनकडून देखील अशाच प्रकारचं एक आवाहन भारतातील चित्रपट निर्मात्यांना कऱण्यात आलं आहे. भारतातील चित्रपट निर्मात्यांनी तुर्कीत आपले चित्रपट चित्रित केल्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा तुर्कीला मिळत होता. मात्र तुर्कीने पाकिस्तानला दिलेली साथ आता त्यांच्याच अंगाशी आल्याचे पाहायला मिळत आहे.
चित्रपट निर्मात्यांना शूटिंगसाठी तुर्कीमधील अनेक ठिकाणे आवडतात. याशिवाय, अनेक तुर्की शो आणि स्टार्सना भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे आणि त्यांचे येथे मोठे चाहते आहेत. मात्र पहलगाम हल्ल्यानंतरही, तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, ज्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या. त्यामुळेच चित्रपट निर्मितीसाठी तुर्कीला जाऊ नये असे निर्मात्यांना आवाहन करण्यात आलंय.
या फिल्मचं शूटिंग झालं तुर्कीला
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल तुर्कीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन भारतातून करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत, दिल धडकने दो, गुरु, कोड नेम: तिरंगा, रेस 2, अजब प्रेम की गज़ब कहानी, एक था टायगर, बागी 3, लाल सिंह चड्ढा, पठाण यांसारख्या अनेक चित्रपटांचे शूटिंग तुर्कीमध्ये झाले आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

