पुन्हा सैराट ! पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने भावने केली हत्या, बहिणीचं मुंडकं केलं धडावेगळं

औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात एक अतिशय़ धक्कादयक असा प्रकार घडलाय. बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केलीय. ही हत्या अतिशय अमानुषपणे करण्यात आली असून यामध्ये भावाने आपल्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे केले आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात एक अतिशय़ धक्कादयक असा प्रकार घडलाय. बहिणीने पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे भावाने तिची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केलीय. ही हत्या अतिशय अमानुषपणे करण्यात आली असून यामध्ये भावाने आपल्याच बहिणीचे मुंडके धडावेगळे केले आहे. हत्या करुन आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगाव येथील एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. तिच्या भावाच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यानंतर आरोपी भावाने आपल्याच बहिणीच्या हत्येचा कट रचला. त्याने बहिणीला घरी भेटायला येण्यास गळ घातली. तसेच बहीण घरी येताच त्याने तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

Published On - 11:06 am, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI