Amravati News : वर्षभराच्या चिमूकल्याला घरी सोडून आई सीमेवर रवाना
BSF Woman Soldier : भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला असून युद्धजन्य परिस्थितीमुळे सुट्टीवर असलेल्या सर्व जवानांना तत्काळ सीमेवर बोलावण्यात आलेलं आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठमधील बीएसएफच्या महिला जवान रेश्मा इंगळे या सुट्टीवर आलेल्या असताना परत सीमेवर बोलावण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता रेश्मा इंगळे या आपल्या एका वर्षाच्या चिमूकल्याला सोडून कर्तव्यासाठी सीमेवर रवाना झालेल्या आहेत. यावेळी आपल्या अंगावर दूधपित्या चिमूकल्याला सोडून जाताना रेश्मा इंगळे यांना अश्रु अनावर झाले होते. त्यांना सुट्टीवर येऊन आठ दिवसच झाले होते. मात्र सीमेवरची परिस्थिती बघता आधी देशसेवा मग कुटुंब म्हणत रेश्मा आपल्या या एक वर्षाच्या तान्हुल्याला सोडून बॉर्डरवर रवाना झाल्या आहेत.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

