Donald Trump : भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध आम्ही टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तान युद्धपरिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.
आम्ही आण्विक संघर्ष टाळला असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्र सज्ज देशातील युद्ध टाळलं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटलं आहे. भारत पाकिस्तानमधल्या युद्धविरामावर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. तसंच युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही असं देखील आम्ही म्हंटलं होतं, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता अमेरिकेने केवळ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्येच मध्यस्थी केली नाही, तर ‘अणु संघर्ष’ देखील टाळला असा दावाच ट्रम्प यांनी केला आहे.
भारत-पाकिस्तानच्या तणावपूर्ण परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

