Budget 2023 : भारीच ! इतक्या लाखापर्यंतचं तुमचं उत्पन्न आहे, मग तुम्ही करमुक्त

हर्षदा शिनकर, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 01, 2023 | 1:23 PM

मोदी सरकारकडून नोकरदार, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना खूशखबर, 7 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त

नवी दिल्ली : मोदी सरकारकडून नोकरदार, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना मोठी खूशखबर देण्यात आली आहे. कारण मोदी सरकारने 7 लाखापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्त केले आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नव्हता पण आता ते उत्पन्न वाढवण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. नव्या कर रचनेनुसार तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नावर काहीच कर लागणार नाही. 3 ते 6 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के, 6 ते 9 लाख उत्पन्नावर 10 टक्के, 9 ते 12 लाखाचं उत्पन्न 15 लाखापर्यंत, 12 ते 15 लाखापर्यंत 20 टक्के आणि 15 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे, यासंदर्भातील घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI