Buldhana Hairfall Issue Video : टक्कल व्हायरसमुळे कुणी पोरगीही देईना! बघा सध्या काय परिस्थिती?
बुलढाण्यातील टक्कल व्हायरसचा परिणाम थेट आता सोयरिकीपर्यंत आलाय. टक्कल पडल्याने बुलढाण्यात मुलांना कोणी मुलगी देण्यास मागत नाहीये तर कोल्हापुरात एक व्यक्ती पुन्हा केस उगवण्याचा दावा करतोय.
बुलढाण्यातील शेगाव इथला केस गळतीचा परिणाम आता फक्त केस गळती पुरता मर्यादित राहिला नाही तर थेट सोयरिकीपर्यंत येऊन पोहोचलाय. केस गळतीमुळे शेगावातील बोंड गावात मुलांची लग्न जुळेना झालीत. टक्कल पडतंय म्हणून कोणी पोरंगी देईना झालंय. टक्कल व्हायरसच्या भितीने गावातील सोयरिकी थांबल्यात. अहो इतकंच काय? किराणा दुकानात किराणा मिळेना, ना दुधवाला दुध देईना तर भाजीवाला भाजी देईना झालाय. बुलढाण्यातील शेगाव इथल्या केस गळतीच्या रूग्णांची संख्या १९७ वर पोहोचली आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा आणि आयुष मंत्रालयाच्या पथकासह आयसीएमआरची टीमही ठाण मांडून बसलीये मात्र ही केस गळती नेमकी कोणत्या कारणाने होतेय? याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, आरोग्य यंत्रणांकडून काही व्यक्तीच्या केसांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. त्यामुळे अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण काय? हे समोर येण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे टक्कल पडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चाललीये. तर कोल्हापुरातील एका सलमान नावाच्या व्यक्तीने ज्यांच्या डोक्यावरचे केस गेले त्याचे केस माझ्या औषधाने येऊ शकतात असा दावा केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...

कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
