Lakshman Hake Video : कराडवर आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांनाच केलं आरोपी? 10-10 लाख कुठून आलेत? हाकेंचा सवाल
वाल्मिक कराडविरोधात फसवणुकीचा आरोप करून तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांना लक्ष्मण हाके यांनी आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करत केला मोठा आरोप? बघा काय म्हणाले लक्ष्मण हाके?
ओबीसी आंदोलनाने चर्चेत आलेले लक्ष्मण हाके कोणत्या ना कोणत्या कारणाने अप्रत्यक्षपणे वाल्मिक कराडची बाजू घेताना दिसताय. वाल्मिक कराडविरोधात फसवणुकीचा आरोप करून तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांना लक्ष्मण हाके यांनी आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करून एक विधान केलं. हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांकडे दहा-दहा लाख रुपये कुठून आले? असा सवाल केल्यानंतर शेतकऱ्यांनी हाके सुपारीबाज असल्याचं उत्तर दिलंय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह हार्वेस्टर मालकांनी वाल्मिक कराडसह त्याच्या दोन साथीदारांवर फसवणूक केल्याचा आरोप केलाय. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १४१ जणांना थकलेलं अनुदान मिळवून देतो असं म्हणत प्रत्येकी ८ लाख रूपये घेतल्याचा आरोप वाल्मिक कराडवर शेतकऱ्यांनी केला. मात्र अनेक महिने अनुदान न मिळाल्याने कराडकडून दमदाटी करण्यात आले. त्यावर गुन्हा दाखल होत नसताना शेतकऱ्यांकडे ८ लाख रुपये आले कुठून? असा सवाल केला आणि शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...

कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय

तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
