Dhananjay Munde Video : राईट हँड वाल्मिक कराड 'दरबारा'तून थेट तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनता दरबार

Dhananjay Munde Video : राईट हँड वाल्मिक कराड ‘दरबारा’तून थेट तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनता दरबार

| Updated on: Jan 17, 2025 | 5:45 PM

वाल्मिक कराड खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यात तुरूंगात असल्याने त्याच कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून जनता दरबार भरवला असल्याचे पाहायला मिळाले.

मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराड खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्यात तुरूंगात आहे. दरम्यान, यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात ते स्वतः उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात मुंडे बसतात त्याच जागेवर बसून मंत्री धनंजय मुंडे यांचा प्रतिनिधी म्हणून याआधी वाल्मिक कराड हा काम पाहत असल्याची माहिती समोर येत आहे. तर यावेळी अनेक लोक वाल्मिक कराडला भेटायला यायचं. त्याच कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून जनता दरबार भरवला तर यावेळी ते स्वतः जनतेच्या समस्या जाणून घेत असल्याचे पाहायला मिळाले. एकाबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आमदारांसोबतच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे यांची गैरहजेरी पाहायला मिळाली. तर दुसऱ्या दिवशी असलेल्या कॅबिनेट बैठकीला देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी गैरहजेरी लावली. मात्र त्याऐवजी त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेत जनता दरबारात दाखल होत लोकांना भेटणं अधिक पसंत केल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ

Published on: Jan 17, 2025 05:45 PM