Atul save यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘…म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही’
VIDEO | बाप्पाच्या आगमनाने एककीडे मंगलमय वातावरण तर दुसरीकडे आरक्षणासाठी आंदोलनं, मराठा आरक्षणासंबंधित प्रश्नावर काय म्हणाले कॅबिनेट मंत्री अतुल सावे? विरोधकावर काय केली सडकून टीका
मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ | राज्यात एकीकडे गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने राज्यातील वातावरण हे मंगलमय आहे. तर दुसरीकडे आरक्षणासंबंधित आंदोलन राज्यभरात सुरू आहेत. यावर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि हायकोर्टात ते टिकल्याचेही मंत्री अतुल सावे यांनी म्हटले. त्यानंतर सुप्रीम कोर्टात सरकार बदललं आणि त्यांनी जेवढे लक्ष द्यायला हवं होतं तेवढं दिलं नाही, त्यामुळे कोर्टात त्या प्रकरणाला स्थगिती मिळाली. दरम्यान, सध्या राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार असल्याने आम्ही हे आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आरक्षण टिकलं पाहिजे तसे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करून वेळ द्यावा अशी विनंती केली होती. तसेच सध्याचं सरकार लक्ष घालून यासंदर्भात योग्य निर्णय घेतली, असा विश्वासही अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Sep 22, 2023 05:19 PM
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
