NEET पेपरफुटी प्रकरणी तिसऱ्या मनीषाचं मोठं कांड समोर, थेट NTA कनेक्शन उघड, चक्क फिजिक्सचा पेपर…

| Updated on: May 23, 2026 | 1:23 PM

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरमध्ये अधिक मजबूत होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI ने गेल्या 8 दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडले असून सातत्याने चौकशी सुरू आहे. या तपासात आता आरोपी प्राध्यापिका मनीषा हवालदार यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरमध्ये अधिक मजबूत होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBI ने गेल्या 8 दिवसांपासून लातूरमध्ये ठाण मांडले असून सातत्याने चौकशी सुरू आहे. या तपासात आता आरोपी प्राध्यापिका मनीषा हवालदार यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्या फिजिक्स विषयाच्या प्राध्यापिका असून NTA मध्ये पेपर सेटर म्हणूनही कार्यरत होत्या.

यापूर्वी मनीषा मंधारे हिने बायोलॉजीचा पेपर फोडल्याचा आरोप समोर आला होता, तर प्रल्हाद कुलकर्णी याच्यावर कॅमिस्ट्रीचा पेपरफुटीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता मनीषा हवालदार यांच्यावर फिजिक्सचा पेपरफुटीचा आरोप असल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.

दरम्यान, CBI ने आतापर्यंत लातूरमधील 4 बड्या डॉक्टरांची चौकशी केली आहे. याआधी अनेक प्राध्यापकांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 23, 2026 1:13 PM
Follow Us