CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत 15 लाख…नेमकं काय घडलं?
सीबीएसईच्या री-इव्हॅल्युएशन पोर्टलवर सध्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बोर्डाच्या माहितीनुसार एका वेळी 8000 हून अधिक विद्यार्थी पोर्टलचा वापर करत होते. याच दरम्यान पोर्टलवर मोठा सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, सीबीएसईच्या आयटी टीमने हा हल्ला वेळेत हाणून पाडला.

दुपारी 3 वाजेपर्यंत 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे री-इव्हॅल्युएशनसाठी अर्ज सादर केले होते. त्याचवेळी काही अज्ञात हॅकर्सनी पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ‘डिनायल ऑफ सर्विस’ म्हणजेच DoS अटॅकचा वापर करण्यात आला होता.
अवघ्या 2 मिनिटांत पोर्टलवर तब्बल 15 लाख हिट्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 1 लाखांहून अधिक वेळा पोर्टलच्या फाइल्समध्ये अनधिकृत प्रवेश करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, आयटी टीमच्या सतर्कतेमुळे कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.