Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक; पहलगाम हल्ल्यावर काय निर्णय घेतले जाणार?
Cabinet Meeting Updates : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर होणारी ही पहिलीच बैठक आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. आजच्या होणाऱ्या या बैठकीत काय चर्चा होईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. हल्ल्यानंतर होणारी ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज पहलगाम हल्ल्याला 8 दिवस झाले आहेत. मात्र तरीही या हल्ल्यातले अतिरेकी सापडलेले नाहीत. त्यामुळे या बाबतीतला काही नवीन मोठा निर्णय या बैठकीत घेतला जातो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, काश्मीरमधल्या 87 पर्यटनस्थळांपैकी 48 पर्यटनस्थळं बंद करण्यात आलेली आहे. हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणा पूर्ण प्रयत्न करत आहे. असं असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरपती थांबत नाही आहेत. सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून सलग पाचव्या दिवशी देखील गोळीबार करण्यात आलेला आहे. सगळ्या बाजूंनी पाकिस्तानची कोंडी करण्याचं काम सुरू असतानाही पाकिस्तानच्या या कुरघोड्या थांबलेल्या नाही आहेत. अशा सगळ्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा होते, कोणते निर्णय घेतले जातात याकडे सगळ्या देशाचं सध्या लक्ष लागलेलं आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

