Chandrakant Khaire : ते करतात तर आम्ही का करू नये? पालिका निवडणुकांवर चंद्रकांत खैरे स्पष्टच बोलले
Chandrakant Khaire Interview : शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करत आगामी पालिका निवडणुकीवर भाष्य केलं.
आता लोकांना कळून चुकलं आहे की आपण ज्यांना मतं दिलेले आहेत ते कामच करत नाही. ज्यांना लोकसभेत काय काम करायचं हेच माहीत नाही असे निवडून आलेले आहेत, असं म्हणत शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार संदिपान भुमरे यांना टोला लगावला आहे. टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या मुलाखतीत त्यांनी हा टोला लगावला आहे. आम्ही पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांचा गड कायम ठेवू, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकवू असा विश्वासही यावेळी खैरे यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, महापालिका निवडणुका स्वबळावर लढूयात याबद्दल आम्ही मागणी केलेली आहे. या संदर्भात काही प्रमाणात आमची चर्चा देखील झालेली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं की काही प्रमाणात ते स्वबळावर लढतील आणि काही ठिकाणी युती करतील. मग ते जर तसं करत असतील, तर आम्ही का करू नये? असा सवलही यावेळी खैरेंनी उपस्थित केला.