ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक विधान, म्हणाले, भविष्यात ते…

ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक विधान, म्हणाले, भविष्यात ते…

| Updated on: Jun 02, 2026 | 6:36 PM

शिर्डी येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अनेक नेत्यांनी उपस्थिती लावत पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. यावर बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, भाऊसाहेब वाकचौरे अधिकृतपणे कुठे गेलेले नाहीत. मात्र ते दुसरीकडे जाऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षातील अंतर्गत हालचाली पाहता वाकचौरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटातील काही नेत्यांनीही या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसांत राजकारणात काही मोठं घडेल का? अशी शंका उपस्थित केली जात आहे

Published on: Jun 02, 2026 6:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us