सतेज पाटील-धनंजय महाडिकांच्या हाड वैरावर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील – धनंजय महाडिक यांना काहीजण जाणीवपूर्वक एकत्र येऊ देत नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

कोल्हापूरसह राज्यभरात एकमेकांचे हाड वैरी म्हणून गृहराज्य मंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजप नेते, माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची ओळख आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून (Vidhan sabha election) या दोन्ही नेत्यांचा टोकाचा विरोध राज्याने पाहिला आहे. मात्र आता या दोन्ही कट्टर विरोधकांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील – धनंजय महाडिक यांना काहीजण जाणीवपूर्वक एकत्र येऊ देत नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते. | Chandrakant Patil comment on Satej Patil Dhananjay Mahadik

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI