BJPच्या जीवावर खासदार निवडून आणाऱ्यांनी देशाच्या राजकारण जाण्याची स्वप्न बघू नये

देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटण येथील भाजपच्या (BJP) कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलय. ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

Published On - 10:31 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI