5

प्राजक्त तनपुरे अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचा नवा नेता

भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आज पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केलीय.

प्राजक्त तनपुरे अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचा नवा नेता
किरीट सोमय्या
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 9:24 AM

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आज पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केलीय. किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही आरोप केला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची काल ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली होती. याविषयी बोलताना किरीट सोमय्यांनी प्राजक्त तनपुरे हे अनिल देशुख यांच्या वाटेवर असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर  आरोप

ठाकरे सरकारचे मंत्र्यांचे, नेत्यांचे अनेक घोटाळाचे उद्योग बाहेर येत आहेत. यशवंत जाधव, अजित पवार, अनिल परब आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे ईडी चौकशीला उपस्थित राहिल्याबद्दल विचारले असता किरीट सोमय्यांनी शरद पवार काय करू शकतात हे राज्याच्या जनतेला कळेल. लाखो शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने एनसीपीच्या नेत्यांच्या नावाने वळवण्यात आले. राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. 100 कोटीची संपत्ती 13 कोटीत दिली गेली तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केली.

प्राजक्त तनपुरेंवर कारवाई होणार

प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीनं प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला, असं किरीट सोमय्या म्हणाले. त्याचे पुरावे बाहेर आले आहेत, त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं.

अनिल परब यांचा रिसॉर्ट अवैध होता

अनिल परब हे ऊद्धव ठाकरेंचे लाडके , पण त्यांच्या रिसॉर्टचा एनए/ गैरकृषी परवाना हा ऊद्धव ठाकरे सरकारनेच रद्द केला. म्हणजे हा रिसॉर्ट अवैध होता. परवाना अवैध पद्धतीने मिळवला होता.

इतर बातम्या:

Ratnagiri Elections | रत्नागिरीतील नगरपंचायत निवडणुकीत उलथापालथ, शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी, नव्या समीकरणांचा आमदार कदमांना फटका

संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, ममता बॅनर्जींसोबत मुंबईत राहुल गांधींसोबत दिल्लीत त्यांच्या सुरात सूर मिसळतात, चंद्रकांत पाटलांची टीका

Kirit Somaiya said Prajakt Tanpure transfer Ram Ganesh Gadkari Sugar Mill to Anil Deshmukh ED take action against him

Non Stop LIVE Update
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?