AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, ममता बॅनर्जींसोबत मुंबईत राहुल गांधींसोबत दिल्लीत त्यांच्या सुरात सूर मिसळतात, चंद्रकांत पाटलांची टीका

शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केलीय.

संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, ममता बॅनर्जींसोबत मुंबईत राहुल गांधींसोबत दिल्लीत त्यांच्या सुरात सूर मिसळतात, चंद्रकांत पाटलांची टीका
संजय राऊत, चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 7:41 AM
Share

सातारा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटण येथील भाजपच्या (BJP) कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) भेटीवर सडकून टीका केलीये. संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय.

मुंबईत ममता बॅनर्जींच्या सुरात सूर

शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केलीय.

सत्ता टिकवण्यासाठी काहीही करायला तयार

सत्तेची खूर्ची टिकवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.ममता बनर्जी यांनी युपीए कुठं आहे असा प्रश्न विचारला होता त्यावेळी संजय राऊत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राऊत गेले असतील अशी जहरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साता-यातील फलटण येथील कार्यक्रमात केली आहे. संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवरुनचं चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

हे गोंधळी सरकार आहे का?

चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यायावरुन देखील सरकारवर टीका केलीय. हे काय चाललय, गोंधळी सरकार आहे का? फक्त ओबीसी जागा वगळून निवडणुका म्हणजे कपाळाला हात मारून घायचा का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय गोंधळात गोंधळ निर्माण करणारा आहे, असं पाटील म्हणाले. निवडणूक आयुक्तांनी हे आताच स्पष्ट करावं.राजकीय पक्षांनी दोनदा निवडणुका करायच्या का? असा सवाल देखील पाटील यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा विचार कॅबिनेट मध्ये झाला. हे हुकूमशाही सरकार आहे. आतापर्यंत 60 कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्या असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

इतर बातम्या:

मोठी बातमीः औरंगाबादेत मालमत्ता करावर 75 टक्के सूट, महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त विशेष योजना

औरंगाबादकरांनो,आता उपभोक्ता करही भरावा लागणार, कशासाठी लावलाय नवा कर? तुमच्या मालमत्तेवर किती शुल्क?

BJP state president Chandrakant Patil slam Sanjay Raut over meeting with Mamata Banerjee and Congress Leader Rahul Gandhi

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.