Special Report| पाच राज्यातील निवडणुकीवरुन राजकीय आखाडा तापला, चंद्रकांत पाटलांचे पवार, राऊतांना बोचरे सवाल

यूपीत परिवर्तन होणार, असा दावा शरद पवारांनीही (Sharad pawar) केला आणि संजय राऊतांनीही भाजपला डिवचलं. त्यानंतर जळजळीत ट्विट करुन चंद्रकांत पाटलांनी पवार पंतप्रधान कधी होणार ? आणि उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार? असा सवाल केला.

मुंबई : सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय आखाडा गाजत आहे. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार, असा नारा शरद पवार यांनी दिलाय. तर उत्तर प्रदेश (up elections 2022) गोव्यात परिवर्तन होणार, शिवसेना 50 जागा लढणार अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay ruat) यांनी दिली आहे. यांच्या याच वक्तव्यांनंतर, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निशाण्यावर पवार आणि ठाकरे आलेत. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीशी हातमिळवणी करुन लढणार अशी घोषणा करताच, यूपीत परिवर्तन होणार, असा दावा शरद पवारांनीही (Sharad pawar) केला आणि संजय राऊतांनीही भाजपला डिवचलं. त्यानंतर जळजळीत ट्विट करुन चंद्रकांत पाटलांनी पवार पंतप्रधान कधी होणार ? आणि उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार? असा सवाल केला. सध्या निवडणुका जरी बाहेरील राज्यात होत असल्या तरी त्यावरून राज्यातल्या नेत्यांमध्ये जोरदार वार-पलटवार सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Published On - 11:49 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI