घटकपक्षांना भाजपमध्ये योग्य स्थान- चंद्रकांत पाटील
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे तसेच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा पत्ता भाजपाने कट केला, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणात स्वल्पविराम असतो, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाकडून जाहीर झालेल्या उमेदवारीचे स्वागत तर घटकपक्षांना ठेंगाच दाखवला आहे. “घटक पक्षांना पार्टीत योग्य स्थान आहे. यावेळेला सहा जागा निवृत्त झाल्या. विधानसभेतील संख्या 122 वरून 106 झाल्यामुळे चारच मिळतील. पाचव्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशावेळी दोन नावे कमी करताना कसरत असते. शेवटी न्याय देत असताना कोणावर तरी अन्याय होत असतो. त्यामुळे घटक पक्षांना बाजूला ठेवण्याचा कोणताही उद्देश नाही,” असे ते म्हणाले. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे तसेच रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा पत्ता भाजपाने कट केला, त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

