सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर आढळलं
सध्या नागरिकांना फूड पॉयझनिंग, उलट्या, पोटातील आजार अशा समस्या उद्भवत आहेत, याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
सध्या नागरिकांना फूड पॉयझनिंग, उलट्या, पोटातील आजार अशा समस्या उद्भवत आहेत, याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. अलीकडेच महाराष्ट्रात दुधामध्ये तेलाची भेसळ होत असल्याचे समोर आल्यानंतर, चंद्रपुरात बेकरी उपपदार्थांमध्ये अत्यंत अशुद्धता आढळली आहे.
यावेळी आढळलेल्या उत्पादनांवर आवश्यक लेबल नाही आणि दर्जातही त्रुटी आढळल्या. इतकेच नाही तर टोस्ट, खारी, बेकिंग केक सारख्या वस्तूंवर लेबल नव्हते; अंदाजे यावर मोठ्या ब्रँडचे लेबल लावून विक्री केली जात असावी. या छापेमारीमध्ये अशुद्ध मैदा जप्त करण्यात आला असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाकडून तसेच अन्न आणि औषध प्रशासनाकडून नागरिकांना दुकानातील वस्तू खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नाही तर नागरिकांनी वस्तूची शुद्धता, एक्सपायरी डेट तपासून खरेदी करावी असेही सांगितले आहे.
