VIDEO : कार सुसाट, थेट घरात, चंद्रपुरातील फिल्मी थरार

पण चंद्रपूर जिल्ह्यात अशाच एक फिल्मी थरार घडला आहे. (Chandrapur car lost control broke into a house)

  • निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 23:37 PM, 26 Feb 2021

चंद्रपूर : सुसाट जाणारी कार थेट घरात घुसल्याचा प्रकार तुम्ही फक्त चित्रपट किंवा मालिकेतच बघितला असेल. पण चंद्रपूर जिल्ह्यात अशाच एक फिल्मी थरार घडला आहे. चंद्रपुरातील एका कारचे नियंत्रण सुटल्याने ती कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात शिरली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Chandrapur car lost control broke into a house)

चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला. चंद्रपूरहून अहेरी मार्गे एक कार अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या घरात घुसली. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नव्हते.

सुमारे 100 फूट दूरवर असलेली कार घरात धडकल्याने केवळ वित्तहानी झाली आहे. यात गाडीत असलेल्यांनाही कोणतीही इजा झाली नाही. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गाडी बाहेर काढण्यास मदत केली आहे. (Chandrapur car lost control broke into a house)