VIDEO : लॉकडाऊन लागला तर घरी तुमचे खायचे-प्यायचे वांदे होऊ नये म्हणून… Balu Dhanorkar यांचा खास सल्ला

सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागला, तर घरी तुमचे खाण्या-पिण्याचे वांदे होऊ नयेत, म्हणून तुम्ही आपल्या पत्नीशी प्रेमाने वागा, असा मिश्किल संदेश खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. हा संदेश देणारं स्टेट्स त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलं आहे.

सध्या राज्यात आणि देशात कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागला, तर घरी तुमचे खाण्या-पिण्याचे वांदे होऊ नयेत, म्हणून तुम्ही आपल्या पत्नीशी प्रेमाने वागा, असा मिश्किल संदेश खासदार बाळू धानोरकर यांनी दिला आहे. हा संदेश देणारं स्टेट्स त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलं आहे. बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI