बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे?; शिवानी वडेट्टीवार यांचं वक्तव्य
Shivani Wadettiwar Statement About Sawarkar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा; पाहा काय म्हणाल्या शिवानी वडेट्टीवार...
चंद्रपूर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे. बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून समर्थन देणारे सावरकर हिंदूचे प्रेरणास्थान कसे?, असं एका कार्यक्रमाला दरम्यान बोलताना शिवानी वडेट्टीवार यांनी बोलताना म्हटलं. त्यानंतर “सावरकरांनी “सहा सोनेरी पाने” या त्यांच्या पुस्तकात बलात्कार हे राजकीय हत्यार आहे हे विकृत विधान केलेलं आहे. ज्यांना पुरावा पाहिजे त्यांनी ते पुस्तक वाचावे”, असं ट्विटही शिवानी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होतेय.
संविधान हे वरदान आहे !#Constitution #Democracy #Equality #DrBabasahebAmbedkar #Blessed #Empowerment #Chandrapur #Nagpur #Gadchiroli #Maharashtra pic.twitter.com/CMZwp3w7j7
— Shivani Wadettiwar (@SVW790) April 14, 2023
सावरकरांनी “सहा सोनेरी पाने” या त्यांच्या पुस्तकात बलात्कार हे राजकीय हत्यार आहे हे विकृत विधान केलेलं आहे. ज्यांना पुरावा पाहिजे त्यांनी ते पुस्तक वाचावे.
— Shivani Wadettiwar (@SVW790) April 14, 2023
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

