चंद्रशेखर बावनकुळे अभिमन्यू सारखं बडबडू नका, कारण तुमचा केव्हाच घटतकोच केला आहे- सचिन खरात
त्यामुळे महाराष्ट्राबद्दल ताईचं प्रेम दाखवणारे आणि गुजरात बद्दल आईचे प्रेम दाखवणाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या दौऱ्यावर टीका टीका करू नये असं आव्हान खरात यांनी केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे(chandrashekhar bavankule) तुम्ही अभिमन्यू सारखं बडबड करू नका, कारण तुमचा केव्हाच देवेंद्र फडणीस (Devendra fadanvis )यांनी घटतकोच केला आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा अशी टीका आरपीआय खरात पक्षाचे नेते सचिन खरात (Sachin kharat)यांनी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळेजी राज्यातील जनतेने तुम्हाला ओळखलं आहे. कारण तुमचं सरकार आल्या आल्या तुम्ही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मान्यता दिली आणि आरे कारशेडचं काम चालू केलं. हे राज्यातील जनतेने पाहिलं आहे त्यामुळे महाराष्ट्राबद्दल ताईचं प्रेम दाखवणारे आणि गुजरात बद्दल आईचे प्रेम दाखवणाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या दौऱ्यावर टीका टीका करू नये असं आव्हान खरात यांनी केलं आहे.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

