Chandrayaan-3 landing live : इस्रो काही तासात इतिहास रचणार आहे. कारण चांद्रयान ३ चंद्रावर लँड होणार आहे. चांद्रयान ३ मिशनकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. भारतीत स्पेस रिचर्स संस्था इस्रोने या वर्षी पुन्हा एकदा चंद्रावर लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या वर्षी देखील हा प्रयत्न करण्यात आला होता. पण लँडरचं सॉफ्ट लँडिग होऊ शकलं नव्हतं. ज्यामुळे त्याचा संपर्क तुटला होता. पण मागच्या वर्षीच्या अपयशातून इस्रोने आता धडा घेत नवी योजना आखली आहे. ISRO ने लँडर लँड होण्याआधी मोकळी आणि सपाट जागा शोधली आहे. त्यामुळे यंदा हे मिशन यशस्वी होणार आहे.
भारत ठरणार पहिला देश
इस्रो Chandrayaan 3 च्या कामगिरीमुळे चंद्रावर यान पाठवणारा तिसरा देश तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारा पहिला देश ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त 15 वर्षाच्या अनुभव असलेल्या इस्रोचं हे तिसरं चंद्र मिशन आहे.
इस्रोच्या कामगिरीचं जगभरातून कौतूक होत आहे. इस्रोने आतापर्यंत अनेक यशस्वी मिशन पार पाडले आहे. त्यामुळे इस्रोवर जगभरातील शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. चांद्रयान ३ मिशन देखील फत्ते होणारच अशी भारतीयांच्या मनात आशा आहे.