PROMOTER SHARE | PROMOTER HOLDING गुंतवणुकीआधी प्रमोटरची मालकीहक्क तपासा

एखाद्या कंपनीमध्ये प्रमोटर (Promoter) म्हणजेच प्रवर्तकाची भागीदारी (Partnership) किती असावी तसेच प्रमोटरची भागीदारी म्हणजे काय? याविषयी गुंतवणूक (Investment) करण्याआधी जाणून घेतल्यास तुमचा पैसा बुडणार नाही.

प्रदीप गरड

|

Jan 27, 2022 | 5:54 PM

Budget 2022 Videos : एखाद्या कंपनीमध्ये प्रमोटर (Promoter) म्हणजेच प्रवर्तकाची भागीदारी (Partnership) किती असावी तसेच प्रमोटरची भागीदारी म्हणजे काय? याविषयी गुंतवणूक (Investment) करण्याआधी जाणून घेतल्यास तुमचा पैसा बुडणार नाही. प्रमोटरची भागिदारी म्हणजे काय, तर एखाद्या कंपनीमध्ये प्रमोटरकडे शेअर्सची मालकी किती आहे, जर प्रमोटर कंपनीचा मालक आहे आणि कंपनी सुरू करत असेल तर त्याच्याकडे शंभर शेअर्स असतात मात्र ज्यावेळी कंपनीला अधिकचं भांडवल लागतं त्यावेळी प्रमोटर आयपीओ किंवा इतर माध्यमातून भांडवल उभं करतो. तरीही काही शेअर्सचा मालकी हक्क प्रमोटरकडे कायम असतो. कंपनीमध्ये प्रमोटरकडे जेवढे जास्त शेअर्स तेवढा ताबा जास्त. कंपनीमध्ये प्रमोटरचे 45 ते 50 टक्के शेअर असणे चांगले असते. तर 75 टक्के असल्यास अतिउत्तमच..

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें