Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vicky Kaushal Video : शिवजयंतीनिमित्त 'छावा' फेम विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”

Vicky Kaushal Video : शिवजयंतीनिमित्त ‘छावा’ फेम विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा…”

| Updated on: Feb 19, 2025 | 3:46 PM

गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ सिनेमामुळे अभिनेता विकी कौशल चांगलाच चर्चेत असून त्याला प्रेक्षकांसह चाहत्यांचे मोठं प्रेम मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दर्शन घेण्यासाठी विकी कौशल हे रायगडावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच छावा फेम अभिनेता विकी कौशल थेट रायगडावर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ सिनेमामुळे अभिनेता विकी कौशल चांगलाच चर्चेत असून त्याला प्रेक्षकांसह चाहत्यांचे मोठं प्रेम मिळत आहे. या सिनेमामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दर्शन घेण्यासाठी विकी कौशल हे रायगडावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विकी कौशलने आपल्या भावना व्यक्त केल्यात. ‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, मला याठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संर्वांना शुभेच्छा देतो. रायगडावर येण्याची संधी मिळावी हे माझं एक स्वप्न होतं दर्शनाची ओढ होती आणि आज महाराजांचे आशीर्वाद मिळालेत म्हणून खूप भारी वाटतंय, असे विकी कौशलने सांगितले. छावा सिनेमात साकारलेल्या भूमिकेबद्दल विकी कौशलला विचारलं असता तो म्हणाला, सिनेमातील भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत लागली, छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या यातना सोसल्या आहेत, त्यापुढे आमची मेहनत काहीच नाही. त्यामुळे महाराजांची कथा जगासमोर मांडण्याची गरज असल्याचेही मत त्याने व्यक्त केले.

Published on: Feb 19, 2025 03:46 PM