Chagan Bhujbal Video : राज्यपाल बनवण्याच्या चर्चेवर भुजबळ स्पष्टच म्हणाले, ‘…म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्यासारखं’
राज्यपाल बनवणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करु.... छगन भुजबळांना तुम्हाला राज्यपाल बनवण्यात येणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर भुजबळांनी हे उत्तर दिलं.
राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना तुम्हाला राज्यपाल बनवण्यात येणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर छगन भुजबळांनी स्पष्टच आपली प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ म्हणाले, “राज्यपाल बनवणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करु. माझं काम आहे की मी गोरगरिबांसाठी भांडणं. राज्यपाल झाल्यानंतर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार आहे का, बोलू शकणार आहे का?” असा सवाल छगन भुजबळांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, “मी राज्यपाल पदाचा अपमान करु इच्छित नाही. ते मोठं पद आहे. नाहीतर परत मी राज्यपाल पदाचा अपमान केला असं म्हणतील. राज्यपाल पद घेतलं तर मी भटक्या, विमुक्तांचे आरक्षण आणि सरंक्षण मी करु शकणार नाही. त्यामुळे मी जसा मोकळा आहे तसा ठीक आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांची पुण्यात आज प्रकट मुलाखत पार पडली. जाधव इंस्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या युवा संसद कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान बोलताना छगन भुजबळांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

