Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांना सवाल; 100 एकरवर सभा,10 कोटी आणले कुठून?

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचा जरांगे पाटील यांना सवाल; 100 एकरवर सभा,10 कोटी आणले कुठून?

| Updated on: Oct 13, 2023 | 11:39 AM

tv9 Special Report | जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद यात्रेची सांगता होणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी १०० एकर जागेवर होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र याच तयारीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केलेत.

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद यात्रेची सांगता १४ ऑक्टोबर रोजी १०० एकर जागेवर होणाऱ्या सभेने होणार आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी या गावात त्यांच्या सभेची तयारी सुरूये. मात्र याच तयारीवरून ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केलेत. लोक १० रूपये देत नाही मग १० कोटी कुठून आणले? असा थेट सवाल भुजबळ यांनी केलाय. मुंबईतील समता परिषद बैठकीतून असा सवाल जरांगे यांच्यावर भुजबळांनी निशाणा साधलाय. आरक्षण गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही तरीही जरांगे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागत आहेत. आरक्षण मिळाल्यावर ओबीसी समाज कुठं श्रीमंत झाला, असं भुजबळ म्हणालेत. जरांगे पाटलांची सध्या संवाद यात्रा सुरु आहे. आणि 14 तारखेला ज्या ठिकाणी जरांगेंनी उपोषण केलं, त्या अंतरवाली सराटी गावात सांगता सभा होणार आहे. त्याच सभेवर भुजबळ समता परिषदेत बोलत होते. बघा काय केला हल्लाबोल

Published on: Oct 13, 2023 11:39 AM