…तर हे चुकीचे आहे, भाजपला दूर ठेवायचे असेल तर विचार हा करावाच लागेल

ज्यासाठी महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले, त्या भाजपला दूर ठेवायचे असेल तर तिन्ही पक्षाच्या विचारानेच चालावे लागेल असं मतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाना पटोले यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याबद्दल शरद पवार विचार करतील असंही त्यांनी सांगितले.

महादेव कांबळे

|

May 12, 2022 | 11:08 PM

कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनी जालना अकोल्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांमधील राजकारणात भाजपसोबत हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीवर नाना पटोले यांनी खरमरीत टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका केली, याविषयी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, नाना पटोले यांनी जे बोलले आहे, ते चुकीचे नाही, पण असं होता कामा नये. ज्यासाठी महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले, त्या भाजपला दूर ठेवायचे असेल तर तिन्ही पक्षाच्या विचारानेच चालावे लागेल असं मतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाना पटोले यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याबद्दल शरद पवार विचार करतील असंही त्यांनी सांगितले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें