अवकाळी पावसाने शेतकरी संकटात; छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान
Maharashtra Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांनी. पाहा व्हीडिओ...
छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. गारपीटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील जेहुर गावातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. दिनकर धनवटे या शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. एक-एक रूपया जमवून आणि कर्ज काढून कांद्याची लागवड केली. आता हातातोंडाशी आलेलं पीक अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालंय. गारपीट, पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पीकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला आपले अश्रु अनावर झाले आहेत.
Published on: Apr 10, 2023 11:40 AM
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

