आदित्य ठाकरे जे बोलले ते सत्यच; अंबादास दानवे यांचं वक्तव्य
नाशिकला होणारा महिला मेळावा हा नियमित आहे. एखादा नेता गेला म्हणून पडझड होत नाही, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. अण्णा हजारे धमकी प्रकरणी सरकारने कारवाई करावी, असंही दानवे म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर महत्वाचं विधान केलं. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. भाजपसोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे जे बोलले ते सत्य आहे, जे लोक शिवसेनेतून निघून गेले त्यांना भाजपने अडकवण्याचा प्रयत्न केला, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
Published on: Apr 13, 2023 01:33 PM
Latest Videos
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

